श आणि ष मधला फरक स्पष्ट करण्यासाठी त्याला ट लावून जोडाक्षर बनवून उच्चार करून फरक पाहावा.
श्ट असा उच्चार अशक्य आहे तो ष्ट असाच करायला लागतो.
हे असेच आम्हाला आमच्या एका बुजुर्ग मित्राने सांगितले होते. 'श्ट' असा उच्चार अशक्य आहे, हे तेव्हा पटले होते.

एकंदर तुम्ही साध्या सोप्या भाषेत ही भानगड ('श्ट', 'ष्ट', मराठी आणि इंग्रजीतले 'ट', 'त' वगैरे) चांगली समजावून सांगितली आहे. धन्यवाद. थोडा सरावही करून बघितला. कुठेतरी कुणीतरी (बहुधा सुधीर जोशी) संवादफेक उत्तम व्हावी, सुधारावी म्हणून काही व्यायाम सांगितले होते. जीभ टाळ्याला लावून बोलणे, जीभेखाली गारगोटी ठेवून बोलणे असे काहीसे ते व्यायाम होते. सराव करताना त्या व्यायामांचीही आठवण झाली.