काही काही विधाने अत्यंत चपखल आहेत उदा. समाजवाद्यांची आपापसातली पोरकट भांडणे, शिवसेना ही (सुरूवातीच्या काळात) 'वसंतसेना' वगैरे. आचार्य अत्र्यांवरची टिका अवाजवी आणि गैर वाटली. अत्रे तसे राजकारणी कधीच नव्हते. शिवसेनेच्या सुरूवातीपासून माहिमचे डॉ. हेमचंद्र गुप्ते कार्यरत होते, पुढे ते कुठे गेले कोण जाणे.
शिवसेनेची ती हाताबाहेर गेलेली दंगल १९६८ साली झाली, '७२ मध्ये नव्हे. पण ही एक मामुली तपशिलातील चूक. एरवी लेख छान आहे.