१)'शुद्ध' व 'अशुद्ध' म्हणजे काय? ते मराठीसाठी कोणी ठरविले? जे ठरवले गेले
ते मराठीसाठी नव्हतेच. मराठी अक्षराची ओळखही झालेली नसताना हे नियम मांडले
गेले. मराठीला अजून 'मराठी अक्षराचीच' ओळख झालेली नाही म्हणून त्यातील
'शुद्धलेखन' शुद्ध लेखन ठरत नाही.
शेवटचे ठरवले होते ते माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या मराठी साहित्य परिषदेच्या तज्ञ समितीने (१९६०च्या दशकाच्या सुरुवातीस). त्यांच्या दुर्दैवाने 'मराठी अक्षर' या विषयी आपला सिद्धांत त्यांना ठाऊक नसल्याने त्यांनी तो विचारात घेतला नसावा! आपल्या या प्रतिसादावरून इतकाच अर्थबोध होतो की आपण म्हणाल ते शुद्ध व आपणास मान्य नसेल ते अशुद्ध हेच निकष आपण मानता.
२)वर्तमानकाल हा बिंदू नसतो. ते सुरवात व शेवट असणारे 'अंतर' असते. वाहते ती ऊर्जा व त्याची जाणीव होते तो अर्थ असतो.
हा बाउन्सर म्या पामराच्या डोक्यावरून गेला. इतर कोणा वाचकास समजले असल्यास कृपया मला समजवा. मला तरी इथे शब्दांच्या दलदलीत अर्थ हरवल्यासारखा वाटतो.
३)बऱ्याच चुकांच्या उद्भवाचे कारण एक असू शकते.
काही उदाहरणे देऊन स्पष्ट कराल का?
५)आपली विधाने, वरील वाक्यांतील अर्थाबाबत नसून त्यात मी वापरलेल्या शब्दात
आपल्याला भासणाऱ्या चुकांबाबत आहेत. आपल्याला वाक्यातील अर्थ कळला असावा
असे वाटते. वाक्यांचा अर्थ कळला नाही असा उल्लेख आलेला नाही.
वाक्याचा अर्थ कळला की झाले ही जर आपली भूमिका असेल तर आपण शुद्धलेखनाच्या मुळावरच घाव घालत आहात. शुद्धलेखनावर लेख लिहिताना त्यात शुद्धलेखनाच्याच चुका करणे अक्षम्य आहे. वर त्या न स्वीकारता 'अर्थ कळला असावा' ही मखलाशी ! क्या बात है !
६)यातील 'म्हणजे काय ? ' आणि 'कशी' याची उत्तरे एका लेखात देता येतील असे
आपल्याला वाटते कां?
प्रयत्न तर करा. सविस्तर नाही तर नाही, सारांशात सांगा. कळेलही कदाचित आम्हाला. पण आपण सांगितलेच नाही तर कसे कळायचे?
आजवर मराठी अक्षर संस्कृतपेक्षा वेगळे आहे हेच
कोणालाही माहीत नाही.
पुन्हा मुद्दा तोच. हे 'मराठी अक्षर' काय असते, कसे दिसते हे आम्हाला समजावलेत तर चर्चा पुढे जाऊ शकेल.
७)त्यातील प्रत्येक गोष्ट सिद्ध करता येते.
करा की. मग आम्ही मान्यही करू. पण सिद्ध केल्याशिवाय कशी काय मान्य करायची?
त्यासाठी 'मनोगत' हे व्यासपीठ योग्य ठरणार नाही.
का बरे? इथे काय अडचण आहे?