ऊर्ध्वरेषा अनावश्यक" म्हणणाऱ्याने देवनागरी अक्षरांवर रेघा न दिल्यास, बोडकी अक्षरे किती वाईट दिसतात ते कृतीतूनच दाखवले, याबद्दल धन्यवाद!
एखाद्या गोष्टीला सुंदर किंवा वाईट ठरवणे हा सवयीचा आणि संस्कारांचा प्रश्न असतो. पूर्वी तेल लावून, वेणी घालून, केसांत फुले माळणाऱ्या मुलींना सुंदर म्हणत, आज त्यांना काकूबाई म्हणतात. मला प्रत्यक्षात बोडकी अक्षरे वाईट दिसली नाहीत. ती तशी पहायची सवय नसल्याने खटकली इतकेच. त्याही पुढे जाऊन एक उदाहरण देता येईल.
काही दिवसांपूर्वी ८-९ वर्षांच्या देवनागरी-अडाणी मुलांना देवनागरी लिपी शिकवण्याचा प्रसंग आला. लिहिताना ते शिरोरेषा मारण्यास अतिशय अनुत्सुक होते आणि हा काय प्रकार आहे? कोणी शोधून काढली ही पद्धत अशी बालसुलभ विचारणा करत होते. त्यांना हेच सांगितले की ओळ मारल्यावर अक्षरे सुंदर दिसतात नाही का? त्यावर त्यांचे एकजात उत्तर -"आम्हाला काही फारसा फरक दिसत नाही."