शिरोरेषा हा देवनागरी अक्षराचा एक भागच आहे. ती अक्षरांच्या 'माथी' मारलेली जास्तीची रेघ नव्हे(!), असे मला वाटते.

ती माथी मारलेली जास्तीची रेघ नाही हे मलाही वाटते परंतु, जेव्हा एक एक सुटे मूळाक्षर शिकवले (उदा. ल, क, म ) यानंतर कमल लिहिण्याची वेळ आली तेव्हा मुलांनी ती अक्षरे जवळ जवळ लिहून (एक शब्द बनवून) आता या वरच्या रेषा जोडायच्या का त्या रेघांवर पुन्हा एक ओळ आखायची असा प्रश्न विचारला. तेव्हा मूळ अक्षरे शिरोरेषेशिवाय लिहा आणि शेवटी ओळ मारा म्हटल्यावर रेषा अक्षराचा भाग आहे का नाही? हा प्रश्न विचारला.

मुलांवर देवनागरीचे हे सर्व गुण बिंबवायला हवेत असे मला वाटते.

अर्थात. १००% मान्य.

डोक्यावर रेघ नसणे म्हणजे अक्षराचे डोके उडवण्यासारखे आहे असे आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, त्यामुळे रेघ ही अक्षराचा भागच आहे हे मनावर ठसले.

मला वाटतं ज्या काळात आपण मूळाक्षरे शिकलो, वय वर्षे ४-५ त्यापेक्षा वयाने ८-९ वर्षांच्या मुलांना अधिक प्रश्न पडत असावेत आणि शंका येत असाव्यात. त्यांची विचार करण्याची आणि आकलन क्षमताही अधिक असावी. "बाबा वाक्यं प्रमाणम्" मानण्यापेक्षा सयुक्तिक उत्तरांनी मुलांना पटवणे अधिक योग्य. त्यामुळे, ज्या लिपींमध्ये अशी रेघ नाही तीत अक्षरांतली जागा एकतर जाणीवपूर्वक कमी ठेवायला लागते किंवा धावत्या लिपीत लिहून संततरेषेने सर्व अक्षरे पूर्ण करावी लागतात. बेशिस्तीने सुटी सुटी अक्षरे काढीत गेले तर शिरोरेषेच्या लिपीतील शब्द शिरोरेषेमुळे अखंड दिसण्यास मदत होते. हे सांगणे उत्तम.

असो. मूळ मुद्दा सौंदर्याचा होता तर देवनागरी सुंदर आणि डोक्यावर शिरोरेषा नसलेल्या लिप्या कुरुप असे काही असावे असे वाटत नाही. दोष दृष्टीत असावा, लिपीत नाही.