मीरा फाटक व मनोगत मधील सर्व सभासदांस
सप्रेम नमस्कार,
लिखित परंपरा व अक्षर चांगले दिसणे ही प्रत्येकाच्या नजरेने काळाच्या ओघात स्विकारलेली वैयक्तिक गोष्ट ठरते. 'मराठी अक्षर सिद्धांत' या माझ्या पुस्तकातून निसर्गाने मानवावर लादलेल्या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यामुळे 'मराठी अक्षर सिद्धांत' हा मानवाचा शास्त्रीय दृष्टीकोणातला भाषा सिद्धांत ठरतो.
मानवाला 'तोंड, कान, हात, डोळे' आणि 'व्यंजन, स्वर, विराम, अक्षर' असतात! या सर्वांचा वापर कसा करायचा ते ठरविण्याचे स्वातंत्र्य निसर्गाने मानवाला दिलेले आहे. त्यामुळेच मानवाला अगणित भाषा बनवता आल्या. निसर्गाने मानवाच्या मेंदूत भाषा-केंद्रे दिलेली आहेत. निसर्गाने मानवाला भाषा दिलेली नाही. 'व्यंजन, स्वर, विराम, अक्षर' हे भिन्न अर्थ असलेले शब्द आहेत. 'व्यंजन, स्वर, विराम, अक्षर' यांचे अलग अस्तित्व प्रत्येक भाषेला विविधतेने उमगते. इंग्रजी, जपानी अशा चित्र-भाषा शब्दातून 'व्यंजन, स्वर, विराम, अक्षर' यांचे अस्तित्व शोधायचा प्रयत्न करतात. तर मराठी भाषा मौखिक 'व्यंजन, स्वर, विराम, अक्षर' यातून शब्द साकारते. म्हणून मराठी मौखिक-ध्वनी-भाषा ठरते. वाक्यात शब्द असतात. शब्दाच्या मागे व पुढे विराम येतो तेव्हाच शब्द साकारतो. शब्दात अक्षरे असतात. शब्दातील अक्षरे कोणती हे आपल्याला कसे कळेल? आजपर्यंत देवनागरीत संपूर्ण शब्दावर शिरोरेषा दिली जात होती. दोन शब्दातील अलगता 'शब्दावरील शिरोरेषा' आणि 'शब्दाच्या मागील व पुढील रिकामी जागा' यातून व्यक्त केली जात होती. दोन शब्दातील अलगता दर्शविण्यासाठी 'शब्दाच्या मागील व पुढील रिकामी जागा' पुरेशी ठरते. 'शिरोरेषेचा' वापर दोन अक्षरांमधील अलगता दर्शविण्यासाठी केवळ मराठी भाषा करू शकते. कारण मराठी अक्षर 'स्वर', 'व्यंजन + स्वर', 'स्वर + स्वर' अशा तीन रचनेतूनच साकारते. संस्कृतचे अक्षर 'स्वर', 'व्यंजन + स्वर', 'स्वर + स्वर', 'स्वर + व्यंजन', व्यंजन + स्वर + व्यंजन' अशा पाच रचनेतून साकारते. देवनागरी लिपीत 'लिखित व्यंजनाला त्यानंतर स्वर जोडता येतो' पण 'स्वर अर्धाकरून त्याला त्यानंतर व्यंजन जोडता येत नाही'. उदाहरण : ब्राह्मण या संस्कृत शब्दात (ब+र+आ+ह) (म+अ) (ण+अ) अशी तीन संस्कृत अक्षरे आहेत. (ब+र+आ+ह) हे 'व्यंजन + स्वर + व्यंजन' या संस्कृत अक्षररचनेचे, 'व्यंजन + व्यंजन + स्वर + व्यंजन' असे जोडाक्षर ठरते. पण त्यातील 'ह' हा 'म' ला जोडवा लागतो कारण देवनागरीत 'स्वर अर्धाकरून त्याला त्यानंतर व्यंजन जोडता येत नाही'. त्यामुळे दोन अक्षरे शिरोरेषा मारून विलगतेने दाखविणे संस्कृतला शक्य नाही. देवनागरी लिपी मराठी व संस्कृत दोन्ही भाषा वापरतात. मराठी व संस्कृत या दोन भिन्न व तटस्थ भाषा आहेत. मराठी व संस्कृत या मधल्या अक्षरातील फरक कोणता हे आजपर्यंत कोणालाही ठावूक नव्हते. 'मराठी अक्षर सिद्धांत' या माझ्या पुस्तकात ते सविस्तरपणे मांडलेले आहे.
'मराठी अक्षर सिद्धांत' मी १५ वर्षांपुर्वी साकारला. त्यानंतर गेली १५ वर्षे मी तो चुकीचा नाहीना हे तपासण्यात घालवली. सिद्धांत मांडण्यासाठी एवढा संयम आवश्यक होता असे मला वाटले. विविधतेने विचार करून आज मी 'मराठी अक्षर सिद्धांत' मांडून मराठी भाषा निश्चितपणे जगातील सर्वोत्तम भाषा आहे असे मांडत आहे. आता 'ती तशी नाही हे कोणीतरी सिद्ध करून दाखवावे' हीच भावना यामागे आहे!
मनोगतावरील सर्व मान्यवरांनी याचा गंभीरतेने विचार करावा हीच मागणी.
स्नेह व लोभ वाढावा ही इच्छा.
आपला, शुभानन गांगल