मिलिंद फणसे आणि पराग जोगळेकर  यांस

नमस्कार,

आपले अभिप्राय वाचले. यातील, 'आपला सिद्धांत त्यांना ठाऊक नसल्याने त्यांनी तो विचारात घेतला नसावा!', 'बाउन्सर म्या पामराच्या डोक्यावरून गेला', 'मखलाशी ! क्या बात है !', 'सविस्तर नाही तर नाही, सारांशात सांगा', ''मराठी अक्षर' काय असते, कसे दिसते हे आम्हाला समजावलेत तर चर्चा पुढे जाऊ शकेल', 'करा की. मग आम्ही मान्यही करू. पण सिद्ध केल्याशिवाय कशी काय मान्य करायची?', 'का बरे? इथे काय अडचण आहे?', 'ते मराठीसाठी नव्हतेच असे म्हणणे मलातरी विचित्र किंवा पूर्वग्रहदूषित वाटते.', 'एखादे उदाहरण दिल्यास सोपे नाही का जाणार ?' अशा अभिप्रायातून 'नवीन जाणून घ्यायची इच्छा आहे पण स्वतःची गृहीते सोडायची इच्छा नाही हे उमगते.

आजपर्यंतच्या इतिहासात मराठीला व संस्कृतला जे उमगले नाही अशी महत्त्वाची गोष्ट मी 'मराठी अक्षर सिद्धांतातून' मांडली आहे. 'या चर्चेस अधिक वेळ देता आला तर आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयात मनोगत वर येणारे सभासद व पाहुणे नक्कीच रस घेतील असे मला वाटते.' असे आपण म्हणता, पण तेवढा वेळ मला देता येणार नाही. क्षमस्व.

'मराठीचे आजवर कोणालाही न कळलेले 'मीपण' माझ्या 'मराठी अक्षर सिद्धांतातून' मांडलेले आहे', एवढे आपल्यापर्यंत पोचले असावे असे वाटते.

'जालावरील चर्चा ही नवीन कालाचीच देणगी नव्हे काय ? प्रत्यक्षात भेटून बोलणे आजच्या धावपळीच्या युगात जमणे, तेही भौगोलिक अंतरे पार करून, ही कठिण गोष्ट आहे. ह्या चर्चेतूनही जास्त लोकांपर्यंत पोचणे, तेही त्यांच्या सवडीनुसार शक्य होते आहे.' यातील आपली तळमळ उमगली म्हणून मनोगतावर थोडे लिहिले. ज्यांना यात अधिक रस असेल व 'स्वतःची गृहीते सोडायची इच्छा असेल' त्यांनी मला फोनवरून संपर्क करावा, एवढे सांगून मी माझ्यापुरता 'या चर्चेचा' निरोप घेतो.

आपला स्नेही,

शुभानन गांगल