एंप्लॉयमेंट एक्स्चेंज मधून ८० टक्के जागा मराठी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

राखीव जागा????? म्हणजे आरक्षण????????? अबब!!!!!!!!!!

पण आरक्षण हा तर एक वाईट, "चार अक्षरी" (शब्दशः!) शब्द असतो ना? मग हेच आरक्षण तेवढे छानछान कसे?

आरक्षणामुळे आपल्या एका (पक्षी: भाषिक) गटाचे प्रिविलेजेस (मराठी प्रतिशब्द?) टिकणार असतील तर (तेवढ्यापुरते) आरक्षण चांगले, मात्र आपल्या दुसऱ्या (पक्षी: जातीय) गटाचे प्रिविलेजेस नष्ट होणार असतील तर त्यावेळी आरक्षण वाईट, असे काही असते याची कल्पना नव्हती. अडाणीच मी! व्यवहार म्हणून कशाशी खातात ते कळत नाही! केव्हा अक्कल येणार कोणास ठाऊक!

असो. चालायचेच!

- (अडाणी) टग्या.