चौकस साहेबांनी पैशाच्या स्त्रोताचे जे विश्लेषण केले ते अगदी स्पष्ट कळले. विषय बजेटचाच चालला आहे म्हणून त्यांना विचारावेसे वाटते की लालूंनी जी एकदम रेल्वे फायद्यात आणली आहे त्यांत काही गोम आहे का ? की पुढचा रेल्वे मंत्री आल्यावरच त्याचा उलगडा होईल ?  उत्तराची उत्सुकता फार आहे. हा प्रश्न मी प्रवासात एका रेल्वेची कायम कंत्राटे घेणाऱ्याला विचारला होता. रेल्वेची मालमत्ता व जागा विकून ती फायद्यात आली आहे, अचानक उत्तरेकडचे लोक तिकीट काढायला लागणे शक्य नाही,  असे त्याचे म्हणणे होते.