एकाही मुद्द्याचा खुलासा झाला नाही, एकाही शंकेचे निरसन झाले नाही, वापरलेल्या शब्दांची व्याख्याही दिली गेली नाही. मुद्द्यांना बगल देऊन तीच वाक्ये, तेच र्‍हेटॉरिकल प्रतिप्रश्न पुन्हा पुन्हा टंकले गेले. "मी", "माझा" ह्यांची मात्र रेलचेल ! त्यामुळे आमच्यापर्यंत जे पोहोचायचे ते निश्चित पोहोचले. चर्चेविषयी असो की कृतीविषयी, शेवटी समर्थ म्हणून गेले तेच खरे :" केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" !

क. लो. अ.
मिलिंद फणसे