(ब+र+आ+ह) हे 'व्यंजन + स्वर + व्यंजन' या संस्कृत अक्षररचनेचे, 'व्यंजन + व्यंजन + स्वर + व्यंजन' असे जोडाक्षर ठरते. पण त्यातील 'ह' हा 'म' ला जोडवा लागतो कारण देवनागरीत 'स्वर अर्धाकरून त्याला त्यानंतर व्यंजन जोडता येत नाही'.
ह् + म = ह्म असे झालेले आहे. स्वर अर्धा वगैरे करणे ही चुकीची समजूत आहे. तो ह्म असाही लिहिता येतो. त्यात ह् हे पाय मोडक्या व्यंज्ना ऐवजी लिहिले आहे. ( हे लिहिताना मनोगतावर ZWJ आणि ZWNJ कसे लिहावे बरे?)
स्वरानंतर व्यंजन आले की अक्षर संपते स्वरानंतर त्यात स्वरच मिसळू शकतो (आणि अनुस्वार आणि विसर्ग). स्वर + व्यंजन असे जोडाक्षर हीसुद्धा चुकीची समजूत आहे.
ब्राह्मण मध्ये
१. ब्रा = ब् + र् + आ
२. ह्म = ह् + म् + अ
आणि
३. ण = ण् + अ
अशी तीन अक्षरे आलेली आहेत. कळावे.
(परखड)
-प्रदीप