कितीदा दिली मी स्वतःला सजा
कितीदा तुझे नाव केले वजा...

न काहीच मी हातचे राखले
तुझ्या थांबल्या ना नव्या बेरजा

हवे रूप होते तुला कोणते ?
हवी उर्वशी की हवी सारजा ?

अशा रोमरोमात भिनल्यात त्या
स्मृतींची कशी, सांग, घेऊ रजा ?.... सुरेख
-मानस६