अकुहविसर्जनीयाम् कण्ठ:। अ-आ, क-वर्ग, ह आणि विसर्ग हे सर्व कंठ्य वर्ण.

आता उरलेले : ऌतुलसानाम् दंता: । उपूपध्मानीयानाम् ओष्ठौ ।  ऌ, ल, स आणि त-वर्ग हे दंत्य आणि उ-ऊ, प-वर्ग आणि उपध्मानीय हे ओष्ठ्य वर्ण.  उपध्मानीय म्हणजे प-फ पूर्वी येणारा आणि 'प्' सारख्या उच्चाराचा वर्ण. उदा. क:पदार्थ. हा विसर्गचिन्हाने दाखवतात

मराठीतले चमच्यातला च आणि ज़हाज़ातले  ज़, हे दंतमूलीय, दंत्यतालव्य किंवा वर्त्स्य वर्ण. फर्नांडिसमधला फ़ हा इंग्रजीतल्या व्ही प्रमाणे दंत्योष्ठ्य .