युनिकोडमध्ये zwj (झीरो विड्थ जॉइनर) आणि zwnj (झीरो विड्थ नॉन जॉइनर) चा वापर करून अक्षरे जुळत्या आणि न जुळत्या स्वरूपात दाखवता येतात.
जुळत्या स्वरूपात ( म्हणजे इतर अक्षरांशी जुळताना कसे दिसेल ते) दाखवताना zwj वापरतात
न जुळत्या स्वरूपात दाखवताना zwnj वापरतात.
मनोगतावर .j (डॉट जे) वापरून जुळत्या आणि .s (डॉट एस) वापरून न जुळत्या स्वरूपात अक्षरे उमटवता येतात.
h.h.j = ह् , h.h.jm = ह्म
आणि
h.h.s = ह् , h.h.sm = ह्म
असे उमटवता येते.
(जॉइनर साठी जे आणि नॉन जॉइनर साठी एस (सेपरेटर?) असे लक्षात ठेवणे सोपे जाईल असे वाटते. मराठीत लक्षात ठेवायचे असेल तर जे म्हणजे जुळलेले आणि एस म्हणजे सुटे असेही लक्षात ठेवता येईल.)
मुरकुटे ह्यांना हे माहीत नसताना त्यांनी बहुधा नोटपॅडमधील सुविधांचा वापर करून zwj आणि zwnj उमटवले असावेत. (तसे कुणालाही करता येईल.)
चू. भू. द्या. घ्या.