अतिशय बारीक, अभ्यासपूर्ण असे रसग्रहण आहे.

'देवराई' चे संवाद नुसते ऐकू नयेत, ते अभ्यासावेत. अगदी बरोबर म्हणालात!! खरं तर संपूर्ण चित्रपटच अभ्यासण्यासारखा आहे.

पडद्यावर जिथे चित्रपट संपतो, तिथे तो प्रेक्षकाच्या मनात सुरू झाला पाहिजे हे वाक्य अगदी 'क्लिशे' झाले आहे, पण 'देवराई' च्या बाबतीत हे घडते. १००% असेच घडते. मी हा चित्रपट २-३ वर्षांपूर्वी पाहिला होता. नंतर ३ दिवस असा कल्लोळ माझ्या मनात झाल्यासारखे वाटत होते. तेव्हा मनात काय काय विचार झालेत हे आता नक्की शब्दात मांडताही येत नाहीये.

सन्जोप राव, 'देवराई' सारख्या अप्रतिम चित्रपटाचे हे सुंदर रसग्रहण लिहून पुन्हा ते विचार जागृत केल्याबद्दल आभारी आहे!!