आपले मनापासून स्वागत.
१) या रचनेला गझल-एक प्रयत्न असे शीर्षक दिलेत, ते योग्यच होय. ही रचना गीतसदृश आहे. रचनेतील कल्पना नावीन्यपू्र्ण आहेत. आणखी प्रयत्नान्ती आणखी खुलवता येतील.
२) प्रत्येक द्विपदीमधील दुसऱया ओळीतील प्रथमार्ध विनाकारण-फटकून वागल्यासारखा-लांब ठेवला आहे... तसे करण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. या रचनाचमत्कृती तून काहीही साध्य होत नाही.
३) बटबटीत रंग टाळावेत. तुम्ही वापरलेला पिवळा रंग तुम्हाला तरी नेत्रसुखद वाटतो का...?
शुभेच्छा.
येऊ द्या पुढची रचना. प्रतीक्षेत...