नेहमीप्रमाणेच साधी, सहज गझल. मतला सगळ्यात जास्त आवडला.
जेव्हा हसून बघतो, जग हासतेच सारे
जेव्हा उदास असतो, जग खिन्न-खिन्न दिसते...
हे सुद्धा आवडले. खूपच साधेसोपे पण तरीही मौलिक विचार.
शेवटच्या शेराचा अर्थाच्या दृष्टीने जरा जास्त विचार करायला लागला; पण एकापेक्षा जास्त अर्थ निघतील, असे वाटते (तसे अपेक्षितही असेल?) येतोच तो म्हणाला मधल्या 'तो'च्या बाबतीतही काहीसे असेच म्हणता येईल
पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.