संगणकीय मदत केंद्रावर आलेल्या दूरध्वनींवरील खऱ्याखुऱ्या संभाषणातील काही वाक्ये...

-------

मदतनीस - तुमच्याकडे कसला संगणक आहे

ग्राहक - पांढरा

-------

ग्राहक - मी आपल्या संस्थेतून छपाईयंत्र (प्रिंटर) आणला आहे. खूप वेळा प्रयत्न करूनही माझा संगणक या  छपाईयंत्रातून छापू शकत नाहीये. छापण्याची अज्ञा देताच "छपाईयंत्र सापडत नाही" (कॅन्ट फ़ाईन्ड प्रिंटर) असा उद्धटासारखा उत्तर येत आहे... हे पहा मी हे छपाईयंत्र अता संगणकाच्या अगदी समोर ठेवले आहे!

-------

मदतनीस - तुमच्या दर्शन पटलावर (मॉनिटर) सध्या काय आहे?

ग्राहक - माझ्या मुलीने तिची बाहूली ठेवली आहे.

-------

मदतनीस - अता तुम्ही एक काम करा... फ़८ (एफ8) दाबा.

ग्राहक - केले ... पण काही चालत नाही अजून

मदतनीस - नक्की काय केलेत तुम्ही?

ग्राहक - फ़ ही कळ आठ वेळेला दाबली

-------

ग्राहक - मी माहिती जाळ्यात (इंटरनेट) शिरू शकत नाहिये...

मदतनीस - तुम्ही परवलीचा शब्द टाका आणि पुन्हा पहा.

ग्राहक - टाकला ... पण नाही जमत अजून

मदतनीस - तुमचा परवलीचा शब्द काय आहे?

ग्राहक - सहा चांदण्या... मी माझ्या मित्राला हेच करताना पहिले होते