वाटत नाही. लघुनिबंध नाही. लेख नाही. मला वाटते आपण लेखनाचे तंत्र जरा अभ्यासावे. कथा, लेख की लघुनिबंध हे ठरवावे. शेवटचा परि. येईपर्यंत कथा वाटते. रंगायच्या आतच संपते. वरकरणी कथा वाटली तरी पण भावनांचे रेखाटन नाही. तो कथेचा आत्मा आहे. अगदी गुलजारच्या अतिलघुकथांत सुद्धा. शेवटचा परि. लघुनिबंधासारखा आत्मचिंतन विचारप्रवर्तक. परंतु ठोस तार्किक कारणमीमांसा नाही.
कविता ही दैवी प्रतिभेची देणगी आहे. लेखनाला मात्र किंचित प्रतिभेबरोबरच वाचन, अभ्यास, सूक्ष्मनिरीक्षण, विविध नात्यातील विविध भावबंध, या सगळ्याचा मिलाफ असावा लागतो.
नाउमेद होऊ नये. प्रयत्न चालू ठेवा. पण आपले लेखन काही काळाने वाचून पाहावे. फेरफार करून पुन्हा लिहावे. जरूर पडली तर त्या स्वरूपाच्या इतर लेखनाशी ताडून पाहावे. तीनचार लेखनानंतरच पूर्ण करावे.
असो. पु. ले. शु.