वेदश्री - उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व. नरेंद्रजींच्या या वाक्याशी सहमत.
तुझ्या उपक्रमशीलतेचे, उत्साहाचे आणि सातत्याचे मला कौतुक वाटते.
तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. खूप वेळेस अशी काहीतरी मदत करावी असे माझ्यासकट खूप लोकांना वाटत असते, प्रत्यक्षात ते आचरणात आणणारे तुझ्यासारखे खूप थोडे असतात. तेव्हा अशी विनंती आहे की लिहिती राहा, आम्ही पण त्यातून काहीतरी धडा घेऊ शकू. पुढील कामासाठी शुभेच्छा!