चित्रपट पाहिल्यानंतर माझ्याहि मनांत घर केले ते सोनालीने आणि अतुलने.
'गर्ल नेक्स्ट डोअर' म्हणतात तशी. साधी पण चांगली मुलगी.
हे, आणि इतर सगळेच संवाद सोनालीने असे म्हटले आहेत, ती खरोखर भावावर माया करणारी बहीण वाटते. आपल्या सगळ्यांच्या बहिणीसारखी, किंवा आपल्याली जशी बहीण असावी असे वाटते, तशी.
हे अगदी खरे. मला जाणवले पण मनातल्या मनांत देखील याजवळपास जाणाऱ्या सुरेख शब्दांत मांडता आले नाही. आपली शब्दयोजना, मनांतील भावना योग्य शब्दांत मांडणे या गोष्टी अप्रतिम म्हणाव्या लागतील. मी चित्रपट पाहिला पण नांव पाहिले नव्हते. आता कळले.
सामान्यतः भारतीयांना हाताच्या प्रभावी हालचाली करता येत नाहीत. डॉक्टरांनी या बाबतीत एक छोटीशी शिकवणीच घेतली आहे.
हे अगदी खरे आहे. 'मॅनेजमेंट वर्कशॉप' मध्ये प्रशिक्षण देऊनही लोक शिकत तर नाहीतच, वर हातवाऱ्यांची टिंगल करतात.
समीक्षेने अपूर्व आनंद मिळाला. चित्रपटाचा पुनरानुभव तो न पुन्हा पाहता मिळाला.
धन्यवाद. अशाच समीक्षा आणखी येऊ द्यात ही नम्र विनंति.