अंगात शर्ट घालणे हा "कितीतरी जास्त" चूक आहे हे मला पटत नाही. तो एक प्रचलित पुस्तकी वाक्प्रचार आहे. इंग्रजीतील शिपिंग म्हणजे पोस्टाने पाठवणे इतकाच तो चुकीचा आहे. भाषेतील सगळेच वाक्र्पचार कठोर वैज्ञानिक वा गणिती कसोटीवर खरे ठरतील असे नाही. पण भाषेचा तसा उद्देशही नाही. I placed the book on the table. चीनी (mandarin) मधे क्रियापदाला भूतकाळी रुप नसते. तसेच तो आणि ती ह्याला एकच शब्द आहे म्हणून ती भाषा अशुद्ध मानायची का? नाही. कारण हे वैशिष्ट्य त्या भाषेचाच भाग आहे.
बोलीभाषेत आणि लेखी भाषेत फरक हा असणारच. लेखी भाषा ही जास्त नियमबद्ध असते आणि हे सर्व भाषांमधे आहे. आणि बोलताना नारायन किंवा पानी म्हणणे एकवेळ ठीक आहे पण लिहिताना तसे लिहिणे जास्त चूक आहे. पाणी आणि पानी हे समानार्थी शब्द नाहीत. पानी हे पाण्याचे अपभ्रष्ट रूप आहे. नुसते तुम्ही आणि मी आजपासून पानी हे रुप शुध्द म्हणून स्वीकारले असे होत नाही. त्या भाषेत लेखी स्वरूपात तो शब्द रुळला तर मग स्वीकारायला हरकत नाही. पण भसाभसा समस्त अशुद्ध शब्दांना राजमान्यता देणे चूक आहे. त्यांना संघर्षातून जावेच लागणार. जर त्यात ते टिकले तर ठीक. मी असे म्हटलो की water हा शब्द woter पेक्षा किती दूर आहे? आणि बोली भाषेत (phonetically) woter असेच म्हटले जाते. सबब तो शब्द इंग्रजी भाषेने समानार्थी म्हणून स्वीकारावा. तर कुणी ऐकेल का?
मी तरी हे पानी, नारायन, गाडाव असले अशुध्द शब्द लेखी भाषेत न स्वीकारावे ह्या पक्षाचा आहे.