एकदा दोघे जण एका रानातून जात असतात.  तेव्हढ्यात त्यांना दुरून एक अस्वल त्यांच्या रोखाने येताना दिसते.  एक माणूस लगेच आपल्या पिशवीमधून त्याचे "नायकी" जोडे काढून घालू लागतो.  त्याचा सहप्रवासी म्हणतो , " अरे, तू चांगले जोडे घातलेस तरी तू त्या अस्वलापेक्षा काही जास्त वेगाने पळू शकणार नाहीस."  दुसरा त्याला म्हणाला की " "अरे त्या अस्वलापेक्षा नाही, पण तुझ्या पेक्षा तरी मी जास्त वेगाने पळीन की नाही"?  असे म्हणून तो तडक अस्वलापासून दूर पळू लागला.

हा हा हा हसा बरे संदीपबाबू.
सुभाष