मनांतील प्रेयसी अशीच असते. वेड्या मनाच्या भावना अचूक पण स्वप्निल आणि सुंदर शब्दात पकडल्यात.
मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु
वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु
तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु
या भाबड्या भावनांवर
सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु
असा नमुना लाखात एकच, हे गुपित सांगु ...
या भावनेचा कळस चढला आहे. खरेच. प्रत्येक प्रेमवेड्याला आपली प्रिया लाखात एकच वाटते. या भावनेचे अप्रूप किती आणि काय संगू?
अभिनंदन. धन्यवाद आणि शुभेच्छा.