"प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल?"


पण
'तुमभी कहो इस राहका मीत न बदलेगा कभी' चे
तूही म्हण, "वाटेतली - सोबत ही न सरेल कधी"
बरोबर नाही वाटत. "मीत न बदलेगा" चा अर्थ (रस्त्यात तू मला सोडून दुसरी सोबतीण तर शोधणार नाहीस ना?) "सोबत न सरेल" मध्ये येत नाही.
तसेच
"रातें दसों दिशाओंसे कहेंगी अपनी कहानीयां"चा अर्थ
म्हणतिल रात्रीला दिशा - "ह्यांच्या गोष्टी सांग ना"
मध्ये उमटत नाही. मूळ गाण्यात रात्रीं दशदिशांना/दशदिशांनी (हवा तो अर्थ घ्यावा) आपल्या कहाण्या सांगतील असे म्हटले आहे. तुम्ही रात्रीला दिशा म्हणतील 'ह्यांच्या गोष्टी सांग ना' असे  भाषांतर केले आहे. त्या ऐवजी 'रात्रीं दहा दिशांस या कहाण्या कथतील आपूल्या' असे काहीसे केले तर? (मात्रापूर्तीसाठी 'आपुल्या'चा हृस्व 'पु' दीर्घ करावा लागतो आहे.)