पाणावले तरीही डोळ्यांस स्वप्न दिसते
अंधारले तरीही मजला प्रसन्न दिसते...

आहे मला गवसली, ही वेगळीच दृष्टी
ही कालचीच दुनिया मज आज भिन्न दिसते...

मी दृष्य-कल्पनेतच इतका रमून जातो;
उधळीत रंग माझे मन स्वप्नमग्न दिसते...

या कल्पना सुरेखच. पण त्यानंतर कविता वेगळेच अनपेक्षित वळण घेते. शेवटचे कडवे मात्र डोक्यावरून गेले.

असो. छान. शुभेच्छा.