भावनेचा आवेग चढत्या क्रमाने वाढत जातो. पहिल्यापेक्षा दुसरे खोल, त्यापेक्षा तिसरे. असे चढत जाऊन आवेग शेवटच्या दोन ओळीत सुखद कलाटणी घेतो. दर्दभरी ठुमरी ऐकत होतो असे वाटले. कोमल ऋषभाची आर्तता, दोन गांधारामधील आर्त मींड, पूर्ण कविताभर अनुभवून शेवटी तार षडज मिळाला. झकास. जमलेली कविता कशी असावी? तर अशी.