चित्रपटाची जमेची बाजू तुम्ही छानच दाखवली आहे. भावे सुखटणकर मंडळींचे बरेच चित्रपट उत्तम या वर्गातच मोडतात असे मला वाटते.
मला देवराई 'अ ब्युटिफुल माईंड ' बघितला असूनही आवडला. अतुल कुलकर्णीचा चा अभिनय वाखाणण्याजोगा आहे यात शंकाच नाही. कोणत्याही रोलचे त्याने आजवर सोने केले आहे.
या आस्वादात्मक लेखामुळे ज्यांनी देवराई बघितला नाही त्यांना तो नक्की बघावासा वाटेल.