फार सुरेख चित्रपट आहे हा! कॉलेजमध्ये असताना पाहीला होता, आणि मैत्रिणींना पण आग्रहाने पाहायला लावला होता. पण बर्याच मैत्रिणींना तो कळलाच नाही नीट..  (अमराठी पण मराठी कळणार्या मैत्रिणी होत्या माझ्या.. म्हणून असेल..)तेव्हा फार वाईट वाटलेलं..  पण वर म्हटल्याप्रमाणे अक्षरशः भुंगा होतो डोक्यात देवराई पाहून.. माझ्या संग्रहात होता तो!
अतिशय उत्तम रसग्रहण केलंय तुम्ही.. डोक्यात फिट्ट बसलेले सिन्स, डायलॉग्स.. मस्त उतरवलेत.. आणि आख्खा पिक्चर आठवला परत.. फ्रेम टु फ्रेम.. खरच खूप सुंदर पिक्चर.. पण किती स्किझोफ्रेनिक रुग्णांवर उपचार होत असतील? आणि किती लोकांवर विक्षिप्त किंवा चक्रमपणाचा शिक्का बसत असेल? अर्थात हा चित्रपट पाहायच्या आधी फक्त ऐकले होते स्किझोफ्रेनिया बद्दल, या चित्रपटाने अवेअरनेस नक्कीच वाढवला.. अजून एक, देवराई मला जास्त करून स्किझोफ्रेनिया वरचा चित्रपट वाटतो, पर्यावरणाचा उल्लेख 'देवराई' (सेक्रेड ग्रोव्ह ) मुळे आलाय.. त्यामुळे या चित्रपटाला 'पर्यावरणावरील सर्वोत्कृष्ठ चित्रपट' असे ऍवॉर्ड मिळाले होते ते पटले नव्हते..

असो.. खूप खूप आवडले परीक्षण!! ती कविता दिल्याबद्दलही धन्यवाद!