असे चित्रपट मी शक्यतो घरीच पाहतो. एकंदरीत प्रेक्षकांची अभिरुची बघीतली  तर प्रेक्षागृहातील त्यांच्या प्रतिसादाने रसभंग होण्याचीच शक्यता असते. आणि एखाद्या प्रसंगाने समजा डोळ्यात पाणीबिणी आले, तर ते लपवण्याची धडपड करावी लागत नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा या चित्रपटातील प्रसंगांना कसा प्रतिसाद होता, ते मला सांगता येणार नाही. काही काही वेळा 'जे लोकप्रिय असते ते दर्जेदार नसतेच' हा जी.ए.कुलकर्णींचा पूर्वगृह खरा वाटू लागतो!