एक बारीक चूक सुधारून पुढे जातो. 'खाला' हे व्यक्तीचित्र आहे, त्यामुळे त्यात रिवाजाप्रमाणे निरगाठ, उकल अशा तांत्रिक बाबी अपेक्षित नाहीत. मला वाटते आपल्या प्रेमभंगाविषयी तिला काय आणि कसे सांगावे हा लेखकाचा संभ्रम आणि भरत आलेल्या जखमेची खपली निघणे हा त्या व्यक्तीचित्राला दिलेला एक वळसा आहे - 'ट्विस्ट इन दी टेल' म्हणतात तसा. त्याचा खुलासा व्यक्तिचित्राचा भाग नसल्याने लेखकाने दिला नाही.
असे मला वाटते.