एवढ्या चर्चेनंतर मला असे वाटते की...
- अक्षर / शब्दांवर शिरोरेषा द्यावी की नाही हा वैयक्तिक आवडीचा तसेच सवयीचा भाग आहे.
- अक्षर सुंदर आणि खुलून दिसण्यासाठी शिरोरेषा नक्कीच द्यावी.
- एखाद्या व्याख्यानाला गेला असाल आणि वक्त्याच्या भाषणातील मुद्दे पटापट उतरवून घ्यायचे असतील तर शिरोरेषा देत लिहिणे आपोआपच टाळले जाते असे मला अनुभवावरून वाटते. शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना असाच अनुभव येऊ शकतो. अशावेळी लघुलेखन खूप उपयोगी पडेल. लघुलेखन लिपी अर्थातच शिकावी लागेल.
देवनागरीला शिरोरेषा असावी की नसावी या माझ्या प्रश्नाला अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभला आणि माझ्या शंकांचे बऱ्याच प्रमाणात निरसन झाले.उर्ध्वरेषा ऐवजी शिरोरेषा हा अधिक चांगला शब्द मिळाला.
या चर्चेत भाग घेतलेल्या सर्व मनोगतींना मन:पूर्वक धन्यवाद!
आपला
देवनागरी लिपी प्रेमी
- मंदार