(प्रशासक तुमचे शब्द वापरले बरका )
तूही म्हण, "वाटेतली - सोबत ही न सरेल कधी"
बरोबर नाही वाटत. अर्थ (रस्त्यात तू मला सोडून दुसरी सोबतीण तर शोधणार नाहीस ना?) "सोबत न सरेल" मध्ये येत नाही.
अर्थही सुचवण बरी वाटते. कडव्यांमध्ये तीन ओळींचे यमक साधलेले आहे. तुम्हाला तीनही ओळीत बदल सुचले तर फार चांगलेहोईल. ह्यावर मी खूप विचार केला होता. अडचण 'खाणाखुणा' शद्बाला आली. खाणाखुणा हा महत्त्वाच शब्द आहे.आणि त्याला यमक जुळवताना मला नाकी नऊ आले. त्यातल्या त्यात 'ना, न्हा, आणि णा' असे यमक जुळले.
म्हणतिल रात्रीला दिशा - "ह्यांच्या गोष्टी सांग ना"
मध्ये उमटत नाही. मूळ गाण्यात रात्रीं दशदिशांना/दशदिशांनी (हवा तो अर्थ घ्यावा) आपल्या कहाण्या सांगतील असे म्हटले आहे. तुम्ही रात्रीला दिशा म्हणतील 'ह्यांच्या गोष्टी सांग ना' असे भाषांतर केले आहे. त्या ऐवजी 'रात्रीं दहा दिशांस या कहाण्या कथतील आपूल्या' असे काहीसे केले तर?