श्री. गांगल,
तुमचा वरील प्रतिसाद वाचला. संपूर्ण आकलनासाठी तुमचे पुस्तक वाचायला हवे, मात्र परदेशात ते मिळवणे किती सोपे असावे कल्पना नाही. ह्मआणि ऋ बद्दल मला काही शंका आहेत त्या विचारते. तुम्ही लिहिले आहे की मराठीने ह्म नाही तर म्ह स्विकारले आहे. तरीही मराठी माणसालाब्राह्मण मधील ह्म चा उच्चार करता येतो. केवळ ह्मण चा उच्चार जमणार नाही मात्र आधी ब्रा म्हटले की पुढे ह्म चा उच्चार व्यवथित करता येतो. अर्वाच्य मधील केवळ र्वाच्य चा उच्चार करता येणार नाही, मात्र आधी अ लावला की उच्चार व्यवस्थित करता येतो. ब्राह्मण, ब्रह्म असे शब्द मराठीमध्ये संस्कृतातून आले आहेत. संस्कृतातील ब्राह्मण चा उच्चार मराठीत ब्राम्ह्मण का होतो? म्हणजे ब्राह्मणातील ह्म चा उच्चार मराठी भाषकांना व्यवथित जमत असेल तरीही मराठीने ह्म का स्विकारला नाही? ह्म असलेले मराठी शब्द नाहीत हे खरेच, पण तसेच ऋकारयुक्त शब्दांचे आहे. ऋषी, ऋचा, ऋतू, मृदू, कृपा वगैरे सर्व शब्द संस्कृतातून मराठीत आले आहेत. ऋ असलेला आणि संस्कृत नसलेला मराठी शब्द नाही. त्यामुळे मराठीच्या लिपीमध्ये ऋ असू नये असेवाटते का? मग ब्राह्मणाचे मराठीत ब्राह्मणहोते तसे कृष्णाचे क्रुष्ण व्हायला हवे का? ऋ मराठीने स्विकारलेला नाही असे म्हणाण्यास वाव आहे का?
- वरदा