याला पर्यावरण विभागात टाकले होते म्हणे. यावरून अतुल कुलकर्णी व सुमित्रा सुकथनकर यांच्यात मतभेद हि झाले होते. मूळ तो मानसिक विकारावरचा चित्रपट आहे. पण पारितोषिकांच्या सोयिसाठी त्याला पर्यावरणात टाकला होता.  कालच "माझी गोष्ट" हा विद्याधर बापट यांचा त्याच विषयावरचा हा चित्रपट  पाहिला. त्यानंतर मोहन आगाशे व विद्याधर वाटवे यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मोहन आगाशे हे नेहमीच मार्मिक बोलतात. मला तर अशा चित्रपटांची भीती वाटते. काहींना फॅमिली डॉक्टर पुरवणी वाचली कि सगळे रोग आपल्याला झालेत कि काय अशी धास्ती वाटते.