हल्ली शुद्धलेखन-सद्गदित इत्यादी शब्दातली जोडाक्षरे 'द'चा पाय मोडून लिहायची 'फॅशन' आली आहे. इतकेच नव्हे तर काही लोक तशा प्रकारे लिहिण्याचा आग्रह धरतात. प्रा. वसंत वळंजू यांनी व. सु. दे. व. असे नाव देऊन या पद्धतीचा पुरस्कार १७ फेब्रुवारीच्या लोकसत्तेतील एका लेखाद्वारे(की लेखाद्-वारे?) केला आहे. ज्यावेळी टंकयंत्रावरील कळफलकावर जोडाक्षरे बसवता येत नव्हती तोपर्यंत असे टंकलेखन क्षम्य समजले गेले. पण आता संगणकयुगात कितीही अवघड जोडाक्षरे या ना त्या फ़ॉन्ट्स वापरून सहज टंकता येतात, तेव्हा द्वंद्व हा शब्द द्वंद्व असा लिहिण्याचा आग्रह धरणे वेडेपणाचे आहे.
आता शुद्धलेखन याचा उच्चार काय होतो? शुद् धले खन. हा उच्चार आपल्याला अभिप्रेत आहे? सद्गदित=सद् गदित? आत्म्याने=आत् म्याने? खरे उच्चार शुद्ध-लेखन, सद्ग-दित. आत्म्या-ने असे व्हायला पाहिजेत. त्यामुळे जोडाक्ष्रे पाय मोडून लिहिणे साफ चुकीचे आहे.