हल्ली शुद्धलेखन-सद्गदित इत्यादी शब्दातली जोडाक्षरे 'द'चा पाय मोडून लिहायची 'फॅशन' आली आहे.

हल्ली ही नाही आणि फॅशन ही नाही  मी खूप पूर्वीपासून सरकारी पाठ्यपुस्तकांमध्ये, किशोर मासिकात वगैरे द ची जोडाक्षरे द् पुढे जोडून त ची जोडाक्षर त् पुढे अक्षरे लिहून लिहिलेली पाहल्यासारखी आठवतात. विशेषकरून द च्या बाबतीत द्ब द्व आणि ब्द व्द असा गोंधळ (विद्यार्थ्यांचा) होण्याची भीती टाळण्याचा हा प्रयत्न असावा. किंवा महत्त्व मधले दोन अर्धे त स्पष्ट दाखवण्याचा तो प्रयत्न असावा.

(माझ्या आडनावाचे लोक काय काय करतात ते विचारू नका  )

उच्चाराबद्दलचे तुमचे म्हणणे मान्य.

कृपया चूक असल्यास सांगणे

(विद्यार्थिनी)

अलका विद्वांस