नमस्कार,

'कविता-आस्वाद आणि गझल-आस्वाद' हे सॉफ्टवेअर पुढील पत्त्यावर उपलब्ध केले आहे.

शुभानन गांगल : १९/२०, आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९. आधिक माहितीसाठी संपर्क साधा --- टेलीफोन : ९१-२२-२६२०१४७३, मोबाईल : ९१-९८३३१०२७२७, ईमेल : दुवा क्र. १

'कविता-आस्वाद आणि गझल-आस्वाद' या सॉफ्टवेअरची किंमत महाराष्ट्रात रूपये २०८०/- व महाराष्ट्राबाहेर भारतात रूपये २२००/- ला आहे. आपण 'GANGALS' या नावाने DD पाठविल्यास कुरीयर तर्फ हे सॉफ्टवेअर पाठवले जाते. या सॉफ्टवेअर बरोबर तीन पुस्तके मोफत दिली जातात. या तीन पुस्तकातील सिद्धांतावर हे सॉफ्टवेअर आधारलेले आहे. पुस्तकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१] मराठी पद्यातील लगुत्व ओळखण्यासाठीचे नियम.

२] मानवी भाषाविज्ञान : उच्चारसातत्य

३] Perception, Sound, Prose and Poetry.

या सॉफ्टवेअर मध्ये मराठी टाईप करण्यासाठी Shubhaman हा फॉण्ट दिला आहे. यात मराठीत टाईप केले असता संगणक त्यातील पद्याचे बरेच गुणधर्म शोधतो व सादर करतो. कवितेतील ११७१ वृत्ते, ५९१ जाती व ८३ छंद आणि गझलेतील १९ सालीम व २५५ उपछंद संगणक ओळखतो. कविता गझलेच्या अंगाने व गझल कवितेच्या अंगाने तपासता येते. वृत्ते, जाती, छंद यांची माहितीही यातून सादर केली जाते, त्यामुळे वाचनालयात जाऊन माहिती मिळवावी लागत नाही. कविता व गझल यांचा रिपोर्ट संगणकातून जनरेट होतो व तो प्रिंट करता येतो. याशिवाय बऱ्याच गोष्टी यात दिल्या आहेत.

जगातील कोणत्याही भाषेतील कविता/गझल मराठीत लिप्यंतरण केल्यावर यातून तपासता येते. 'अनंत कविता/गझल आणि जगातील कोणतीही भाषा' हा या सॉफ्टवेअरचा आवाका आहे.

आपला मराठी स्नेही,

शुभानन गांगल