पाठ्यपुस्तकांमध्ये पायमोडकी अक्षरे कळफलकावर मराठी नीट बसवता येत नव्हती, म्हणूनच केवळ त्याकाळी छापत असत. आता ती गरज उरलेली नाही. आपल्याला आपल्या आडनावाचा उच्चार विद्-वांस असे ऐकायला आवडेल की विद्वां-स हे आपणच ठरवावे. काट-कसर आणि काटक-सर या उच्चारांत केवळ चुकीच्या ठिकाणी यती घेतल्याने केवढा अर्थ बदल होतो. आपल्या आडनावात असे होत नाही हे केवळ आपले भाग्य! पायमोडकी अक्षरे काढल्याने उच्चारात फरक पडतो हे आपल्याला पटले हे वाचून लिहिण्याचे सार्थक झाले. आपल्या प्रांजलपणाबद्दल धन्यवाद!
आता साईबाबाच्या मूर्तीभोवती गोलाकार अक्षरात श्रध्दा, सबुरी असे लिहिलेले असते. यातील श्रध्दा या शब्दाचा उच्चारतरी करता येतो का? शद्ब, शब्द यांच्या उच्चारातला फरक लहानपणीच समजावून सांगायला हवा. महाऱाष्ट्राच्या अनेक नामवंत देवळाबाहेर महाव्दार किंवा महाद्'वार असे चुकीचे लिहिलेले असते. सिद्धिविनायक असे न लिहिता सिध्दीविनायक असते. हे आपण चालून घेतो म्हणून चालते. हिंदीभाषक अशी चूक का करत नाहीत याचा विचार करावा. त्यांना योग्य तेच शिकवले जाते.