कितीदा दिली मी स्वतःला सजा
कितीदा तुझे नाव केले वजा...
न काहीच मी हातचे राखले
तुझ्या थांबल्या ना नव्या बेरजा
अशा रोमरोमात भिनल्यात त्या
स्मृतींची कशी, सांग, घेऊ रजा ?
उरी दोन उपहार कवटाळते
तुझी आठवण अन् घरे काळजा...
हे शेर विशेष आवडले!!!
सुंदर गझल! सौदामिनी वृत्ताची मजा काही औरच!!!
पुढील लेखनास शुभेच्छा!