सोपेच शब्द अजिबात ओढाताण न करता उत्तम गेय रचना झालेली आहे. एखाद्या संगीतकाराला वाचायला दिलीत तर चांगली चाल लावून गीतही बनू शकेल असे वाटते.

मी होता उदास म्हणतो चुकले आणि
डोळ्यांमध्ये तरारलेले दिसते पाणी

ऐवजी

उदास होता मी, तो म्हणतो, "माझे चुकले."
डोळ्यांमध्ये पाणी दिसते तरारलेले

असे काहीसे केले तर 'चुकले' ची ओळ छंदात नीट बसेल आणि पहिल्या दोन ओळींचे यमकही अधिक योग्य रीतीने साधले जाईल असे वाटते.

अर्थात अधिकार तुमचा आहे.