सत्त्वपुरुषयोरत्यन्तासंकीर्णयोः प्रत्ययाविशेषो भोगः। परार्थत्वात् स्वार्थसंयमात् पुरुषज्ञानम् ।
योगाभ्यासी साधकाची जसजशी प्रगती होत जाते तसतसे अंतःकरण अधिक शुद्ध होत जाते. त्यावरील रजस्तमोगुणांचा प्रभाव कमी होतो आणि वृत्ती उत्पन्न होत नाहीत. अंतःकरण शुद्ध होण्याचा परिणाम सत्त्व गुण वाढत जातो. अंतःकरणाचे सत्त्व, रज आणि तम हे घटक असले तरी सत्त्वगुण वाढीस लागल्यामुळे रज, तम हे सत्त्वगुणात विलिनभावाने राहतात. म्हणून येथे सत्त्व म्हणजे अंतःकरण असे म्हटले आहे.