नेतील कुठे ते ना कळते पेक्षा जातील कुठे ते ना कळते असे करावे.

नेतील हे इंग्रजी रोड लीडस ... ह्याचे भाषांतर वाटते. मराठीत रस्ता जातो असे म्हणतो. रस्ता मला नेतो असे म्हणत नाहीत.

मुरकुटे साहेब,

प्रथम इतका मनलावून विचार करून आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.

पण तुम्ही गाणे ओळखलेले नाही हरकत नाही अजून प्रयत्न करा

आता तुमचा प्रश्न नेतील की जातील.


मराठीत आपण रस्ता जातो असे म्हणतो हे अगदी बरोबर. मी त्याचा विचार केला होता. जातील कुठे ते ना कळते असे लिहले असते तरी ते चालीत बसले असते आणि काही अडचण आली नसती.

पण इथे 'मन का घाबरते?' ह्यावर नायिका उत्तर देत आहे. रस्ता नुसता 'जात' असता तर तितके घाबरायचे कारण नाही पण तो 'मला' कुठे 'नेईल' त्याची खात्री नसल्याने भीती वाटते असा अर्थ घेऊन मी भाषांतर केलेले आहे.