महाराष्ट्र राज्यातील अधिकारी भूषवीत असलेल्या पदांच्या मराठी नावांसाठी वापरायच्या अधिकृत मराठी शब्दांचा हा कोश आहे. तो बाजारात उपलब्ध आहे. त्यातील संस्कृतप्रचुर नावे वाचून आचार्य अत्र्यांनी या कोशाला बदनामकोश असे नाव ठेवले होते. अनेक जणांच्या किरकोळ विरोधानंतरसुद्धा हा कोश आणि यातील नावे आता अधिकृतपणे वापरली जातात.
उच्च न्यायालय सोडून इतर न्यायालयातील कामकाज शक्यतो मराठीतून चालवावे असा सरकारी नियम आहे. तसे ते साधरणपणे चालतेच. पण पक्षकार जर मराठी नसतील तर त्याला समजेल अशा भाषेत कामकाज चालवावे लागते. शिवाय फक्त इंग्रजीतून लिहिलेले कायदे अधिकृत समजले जातात. कारण मराठी भाषांतर चुकीचे असू शकते. भारताच्या राज्यघटनेची इंग्रजी आवृत्तीच प्रमाण मानली जाते. जोपर्यंत कायद्याचा मूळ तर्जुमा मराठीत होत नाही तोपर्यंत हे असेच चालणे सुयोग्य आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे परप्रांतातून बदलून आले असण्याची शक्यता असल्याने त्या न्यायालयांचे कामकाज इंग्रजीतूनच चालते. शिवाय प्रत्येक खटल्याचा वृत्तान्त पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावा लागतो, आणि त्यातील मुद्दे देशभर आधार म्हणून वापरले जातात. यासाठी खटले इंग्रजीतून चालणे देशहिताचे आहे.
मुख्यमंत्र्यांचे मराठीबद्दलचे प्रेम हा राज ठाकरेंना मिळत असलेल्या जनसामान्यांचा पाठिंब्याला घाबरून व्यक्त केलेला विचार आहे. याला राजकीय स्टन्ट म्हणायला पाहिजे.