आपला लेख म्हणजे 'भोचक' पणा वाटतो. 

महाराष्ट्रात रहात असल्याचा आपल्याला अभिमान असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली प्रगती, सुव्यवस्था, (पैसे खाल्ले जात असलं तरी) जपलं जाणारं कायद्याचं राज्य वगैरे वगैरे आपल्या अभिमानाची ठळक स्थळं असतात. ही सगळी अभिमानस्थळं किती सार्थ आहेत, हे महाराष्ट्रात राहून नाही कळत. त्यासाठी महाराष्ट्राबाहेर पडावं लागतं. दक्षिणेतलं माहित नाही. पण उत्तरेत गेल्यानंतर तर हा अभिमान रास्त नसून अत्यंत योग्य असल्याचा भाव आपोआप मनी दाटायला सुरवात होतो. पासून सुरू केलेला लेख सरळ रस्त्यां वर घसरतो.. रस्त्यां बाबतत महाराष्ट्रात मुंबई (मुंबई ... बॉंबे नाही... तसेच इंदौर... इंदूर नाही). सोडली तर परीस्थिती आपण लिहील्या प्र माणेच आहे. पूणे, नाशिक म्हणजे कळसच आहेत. आपण कदाचित होम सीक असाल, पण उगाच इंदौरचा द्वेश करून आपल म्हणजे 'लई भारी' असे करू नकात.

 एरवी इंदूरची आपल्याला ओळख खवय्यांच शहर असं आहे. शिवाय तिथं असलेल्या मराठी मंडळींमुळे आपल्या मनात त्याच्याविषयी एक हळवा कोपरा आहे. पण इंदूरच्या मराठी संस्कृतीवर 'हावी' झालेली हिंदी संस्कृती पाहिली की मग मात्र, तोपर्यंत चढलेला अंमल खाडकन उतरतो. भोचक साहेब इंदौर म. प्र. मध्ये आहे, महाराष्ट्रात नाही. आम मराठी जनतेला उ. प्र. आणि बिहारींनी मुंबईत कसे राहावे वाटते तसेच आपण दूसर्या राज्यात गेल्या वर राहावे, (इंदौर मध्ये सूद्धा)... महाराष्ट्रात मराठी का बिहारी संस्कृती 'हावी' पाहीजेत.... तसेच इंदौर मध्ये हिंदी संस्कृती हावी असणारच..... आपल्याला वैचारीक शूद्धीकरणाची नितांत गरज आहे.   

आपल्याकडे पोलिस खात्याच्या आणि स्वतःच्याही निधीत भर घालण्याचा जो उद्योग पोलिसकाका करत असतात, तो सहसा इथे दिसत नाही. कदाचित त्यामुळेही शिस्त बसत नसावी. तसे केल्यास त्यांना फाट्यावर मारणारी 'जन्ता'ही इथे आहे. त्यामुळे पोलिसही त्या भानगडीत पडत नसावेत. त्यांचा हा उद्योग चालतो तो हायवे परिसरात. एरवी मुख्य शहरात तरी असे चित्र पाहण्यास मी उत्सुक आहे. कायद्याने दंड करणे ठीक आहे, पण आपण ह्या ओळीं मध्ये भ्रष्टाचाराला चालना देताय. 

 माझी महाराष्ट्र पासिंगची गाडी घेऊन मी बिनधास्त शहरभर हिंडत असतो. गेल्या दहा महिन्यात माझं एकदाही लायसन्स तपासलं गेलं नाही. गाडीची कागदपत्र तपासली गेली नाहीत. मुद्दाम पोलिसासमोर गाडी नेऊनही पाहिली, तरीही त्या दयाळू इसमांनी गाडीकडं ढुंकूनही पाहिलं नाही. नियमा नूसार हे योग्यच आहे. दूसर्या स्टेटची आहे म्हणून गाडी आडवणे चूकच आहे. माझ्या कडे तामिळनडू पासिंगची कार आहे, ती मी मराठी मूलूखात वापरतो. फक्त एकदाच एका पांडूनी मला नाशिक मध्ये 'ए अण्णा गाडी साईड को ले' असे हटकले होते, त्याला मी असा धडा शिकवला होता ना.. मला नाही वाटत त्याने परत 'फक्त दूसर्या स्टेट ची आहे म्हणून' गाडी अडवली असेल... 

दूधात साखर विरघळते तसे इंदौर च्या संस्कृतीचा गोडवा वाढवून रहा, इंदौर एंजॉय करा... महाराष्ट्रशी तूलना सोडून द्या, मग बघा कसे सूरेख अनूभव लिहीताल इंदौर बद्दल... आम्हाला पण वाचायला मजा येईल. 

मी स्वतः गूजराथ, तामिळनाडू, कर्नाटक, दील्ली आणि चीन, अमेरीका, जर्मनी, दूबई अशा ठीकाणी वास्तव्य करून परत आलोय.. आपला आभिमान बाळगून झकास मिसळून गेलो सगळी कडे, मराठी मंडळात न जाता स्थानिक लोकांत मिसळून जो आनंद मीळवला तो शब्दांकीत करणे आवघड आहे. ....