काही का असेना पण, ज्या राज्यात आपण कायमचे राहायला आलो आहोत त्या राज्याची भाषा आलीच पाहीजे, यात दुमत कसले? भारतातल्या सगळ्या राज्यांची स्थापनाच मुळात भाषेनुसार झालेली आहे.

आणि भारतातील कोणत्याही राज्यातला माणूस ईतर देशात जातो तेव्हा आनंदाने / भीतीने त्या देशाची भाषा शिकतोच / शिकावीच लागते. मग तसेच मराठीचेच वावडे का इतर सगळ्यांना?