या वरून खुप मागे बघीतलेल्या २ बातम्या आठवल्या. (सहज चॅनल बदलतांना दिसलेल्या )

एकात नवर्याच्या जाचाला कंटाळून घर सोडून आलेल्या बाईची मुलाखत चालू होती. नवरा कसा त्रास देतो हे तिला विचारतांना त्या 'हुषार' मुलाखत काराने तिच्या शेजारी बसलेल्या ४/५ वर्षाच्या मुलीला विचारायला सुरुवात केली, ' पापा मम्मी को कैसे मारते थे ?' 'तुम्हे मारते थे ?' तुम्हे कैसे लगता था? अब कैसे लगता है? पापा को मम्मी की माफी मांगनी चाहीय? मम्मी को घर वापस जान चाहीये? आणि असे आणखी प्रश्न. ती मुलगी आईला चिकटून बसली आणि रडायला लागली तरी याचे आपले सुरुच.  अशी चीड आली.

दुसरी बातमी, मुलींनी कमी कपडे घातले तर मुलांच्या काय प्रतीक्रिया होतात या वर ४ अति विद्वान लोकांची चर्चा चालू होती.  एका मुलीला मुद्दाम कमी कपडे घालून गर्दीच्या वेळी रस्त्यावर सोडले होते (चॅनल नेच). आणि थोड्या थोड्या वेळाने तीला एक एक वस्त्र कमी करायला सांगत होते. म्हणजे, जॅकेट काढ, स्कार्फ काढ वगैरे वगैरे. मग लोक कसे बघतात. मग परत स्कार्फ घाल, जॅकेट घाल, आता लोक कसे बघतात असे चालू होते.

त्यात ही, तरुण मुले कशी बघतात, वयस्कर, म्हातारे कसे बघतात हे चालू होते.

ह्या चॅनल्स कडून तुम्ही काय अपेक्षा करणार ? कपाळ?