गोळेजी,

हा विषय खूप रसपूर्ण आहे. मला स्टीरिओग्रॅम्स पाहण्याचा भरपूर अनुभव आहे, पण हा वरील मात्र दिसू शकला नाही.
मला वाटते यात दोन गोष्टी आहेत -
१. सर्डस हा प्रकार मला कधीही दिसू शकलेला नाही, इतर स्टीरिओग्रॅम्स मात्र बरोबर दिसतात.
२. स्टी̱. ग्रॅ. मध्ये दोन प्रकार असतात - समांतर दृष्टी (पॅरलल) ला दिसणारे व चकण्या दृष्टी (क्रॉस-आइड) ला दिसणारे. यापैकी मला फक्त समांतर दृष्टीप्रमाणेच नजर वळवता येते, दुसऱ्या प्रकारचे पाहता येत नाहीत. दुसऱ्या काही लोकांना चकण्या दृष्टीचेच फ़क्त दिसतात असे कळते.
याविषयी अधिक माहिती करून घेण्याची इच्छा आहे, ज्ञानी व्यक्तींनी सविस्तर लिहावे.

- दिगम्भा