अनेक मराठी भाषिक चैन्ने, बंगलुरू आणि हैद्राबादला असतात त्यांनी कधी त्या त्या भाषा शिकण्याचा यत्न केला आहे काय?
१. त्या राज्यात तशी सक्ती केली असती तर मराठी लोक शिकले असते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही मुद्दा मान्य केला आहेच!
२. ज्याला ह्या मुद्द्याविरुद्ध बोलायचे आहे ते कुठल्याही प्रकारे बोलता येते. उदा समजा तेथे तशी सक्ती असती तर म्हणायचे त्यांनी सक्ती केली म्हणून महाराष्ट्राने सूडाने सक्ती करू नये. समजा त्यांनी सक्ती केली नसेल तर म्हणायचे बघा त्यांनी कुठे सक्ती केली मग तुम्ही का करता. ( ज्याला मुद्याच्या बाजुने बोलायचे आहे तोही असे दोन्ही स्थितीत बोलतो. म्हण्जे त्यांनी सक्ती केली तर म्हणायचे बघा त्यांनी सक्ती केली ते चांगले झाले आता आपणही करू. समजा त्यांनी केली नसेल तर म्हणायचे आपल्याला त्यांच्याशी काय करायचे? आपले प्रश्न वेगले आहेत आपण सक्ती करावी. आज ना उद्या ते ही करतीलच.) तेव्हा इतर राज्यात काय आहे हा मुद्दा सरळ सरळ बिनबुडाचा आहे.
(सडेतोड)
प्रदीप.