यातील समस्त फरारी गुन्हेगार लवकर पकडून त्यांना फाशी दिलेले बघता यावे ही एक इच्छा.
वृकोदरसाहेब, थेट प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे की काय? माणसाने माणसाचा कायदेशीररीत्या जीव घेण्याचा प्रकार तुमच्याप्रमाणेच मलाही बघायला आवडेल. गेल्या शतकांत जाहीररीत्या देण्यात येणाऱ्या मृत्युदंडाची शिक्षा (फाशी, गिलोटिन, मनोऱ्यावरून ढकलणे, क्वार्टरिंग) बघायला अलोट गर्दी असायची म्हणे. आबालवृद्ध शिट्या फुंकत, टाळ्या वाजवत, हसतखिदळत ह्या शिक्षांचा आस्वाद घ्यायचे. त्याकाळी मनोरंजनाची फारशी साधनेही (टीवी, रेडियो) नव्हती म्हणा.
आजच्या युगात मात्र आपण त्या आनंदाला मुकलो आहे, ह्याची खंत वाटते. येत्या काळात 'आजतक' सारख्या वाहिनींना फाशीच्या शिक्षा थेट प्रसारित करण्याची परवानगी देण्यात यावी. जेणेकरून आम्हालाही शिट्या फुंकत, टाळ्या वाजवत, हसतखिदळत एखाद्या जिवंत माणसाचा (होहो.. अतिरेकी, देशद्रोही माणसाचा) प्राण जाताना बघता येईल.
असो. साक्षीमहाराज लेख चांगला जमला आहे.
.